Category: Uncategorized

आयुष्मान भारत

पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात गरीब आणि वंचित लोकांना उपचारिक सुविधा देणारी आयुष्मान भारत योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत निरनिराळ्या कामांसाठी १ लाख रोजगार उपलब्ध होणार असून रोजगार क्षेत्रात भर पडणार आहे. आयुष्मान भारत –राष्ट्रीय आरोग्य संरक्षण अभियान या आयुष्मान भारत अभियाना अंतर्गत केंद्र पुरस्कृत योजनेला मंत्री मंडळाने मान्यता दिली आहे.या योजने अंतर्गतपात्र कुटुंबाला दर वर्षी 5 लाख रुपयांचे कवच मिळेल.एसईसीसी माहितीवर आधारित गरीब आणि वंचित 10 कोटी पेक्षा जास्त कुटुंबाना याचा लाभ मिळेल.केंद्र पुरस्कृत सध्याच्या राष्ट्रीय स्वास्थ्य विमा योजना आणि जेष्ठ नागरिक आरोग्य विमा योजना या योजना या आयुष्मान भारत –राष्ट्रीय आरोग्य संरक्षण अभियानात सामावल्या जातील.


वैशिष्ट्ये
आयुष्मान भारत –राष्ट्रीय आरोग्य संरक्षण अभियान प्रत्येक कुटुंबालावार्षिक 5 लाख रुपयांचे कवच देणारया मध्ये द्वितीय आणि तृतीय सुविधाचा समवेश आहे.कोणतीही व्यक्ती विशेषतः महिला, बालके आणि वृद्ध व्यक्ती वंचित राहू नयेत यासाठी कुटुंबाचा आकार आणि वय यांची मर्यादा ठेवण्यात आलेली नाही. रुग्णालय पूर्व आणि नंतरचा खर्चही या योजनेत समविष्ट आहे. विशिष्ट वाहतूक खर्चही लाभार्थीला देण्यात येईल. संपूर्ण देशात कुठेही हा लाभ घेता येईल देशातल्या सुचीबद्ध कोणत्याही खाजगी अथवा सरकारी रुग्णालयात रोकड रहित या सुविधेचा लाभ घेता येईल. ग्रामीण भागात कच्च्या भिंती आणि छप्पर असलेले एकच खोली असलेले घर,16 ते 59 या वयोगटातला एकही सदस्य नसलेले कुटुंब,अनुसुचित जाती, अनुसूचित जमाती परिवार,दिव्यांग आणि कुटुंबात शारीरिक सक्षम व्यक्ती नसलेले कुटुंब अशा वेगवेगळ्या श्रेणीतील कुटुंबे तर शहरी भागात 11 श्रेणीतली कुटुंबे या योजनेसाठी पात्र आहेत. लाभार्थी सुचीबद्ध सरकारी किंवा खाजगी रुग्णालयाचा लाभ घेऊ शकतो. ही योजन लागू करणाऱ्या राज्यातली सर्व सरकारी रुग्णालये या योजने अंतर्गत येतील. खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपचाराचा खर्च पेकेज दरानुसार केला जाईल.उपचार्शी सबंधित सर्व खर्चाचा यात समावेश असेल.

लाभार्थीसाठी हा रोकड विरहीत आणि कागद विरहीत व्यवहार असेल. या योजनेचे मुख्य तत्व म्हणजे सहकार्यात्मक संघीय वाद आणि राज्यांसाठी लवचिकता हे आहे. राज्य सरकार या योजनेचा विस्तार करू शकतात, अंमलबजावणीच्या शक्यता निवडण्याचे राज्यांना स्वतंत्र राहील. राज्य सरकारे,विमा कंपन्या अथवा ट्रस्ट/ सोसायटी मार्फत थेट याची अंमलबजावणी करू शकतात. केंद्र आणि राज्य यांच्यातले सहकार्य गतिमान करण्यासाठी आयुष्मान भारत राष्ट्रीय आरोग्य संरक्षण प्रशासकीय मंडळ स्थापण्याचा प्रस्ताव आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री याचे अध्यक्ष असतील. योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी राज्याकडे राज्य आरोग्य एजन्सी असणे आवश्यक आहे. विद्यमान ट्रस्ट, राज्य नोडल एजन्सी, अथवा नवा ट्रस्ट, सोसायटी स्थापन करण्याचा पर्याय राज्याला खुला असेल. निधी वेळेत पोहोचावा यासाठी केंद्र सरकारकडून राज्य आरोग्य एजन्सीना थेट विशिष्ट खात्यात निधी जमा केला जाईल नीती आयोगासमवेत भागीदारी करून आधुनिक, प्रमाणित माहिती तंत्रज्ञान व्यासपीठ कार्यान्वित केले जाईल ज्यामुळे रोकड तसेच कागद विरहीत व्यवहार केला जाईल. त्याला तक्रार निवारण यंत्रणेची जोड दिली जाईल योग्य लाभार्थी पर्यंत योजना पोहोचावी यासाठी सर्वंकष माध्यम आणि सर्वदूर धोरण विकसित केले जाईल.


अंमलबजावणी धोरण –
राष्ट्रीय स्तरावर आयुष्मान भारत राष्ट्रीय संरक्षण अभियान एजन्सी कार्यान्वित केली जाईल. राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांनी राज्य आरोग्य एजन्सी द्वारे योजनेची अंमलबजावणी करण्याचा सल्ला देण्यात येत आहे.


मुख्य परिणाम –
गेल्या दहा वर्षात भारतात रुग्णालय खर्चात सुमारे 300% वाढ झाली आहे.80% पेक्षा जास्त खर्च ओओपी द्वारे केला जातो. या योजने मुळे दर्जेदार आरोग्य सुविधा आणि औषधोपचार मिळण्याला मदत होणार आहे. आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे ज्या आरोग्य गरजा आणि उपचार केले जात नव्हते त्यांना आता आर्थिक पाठबळ मिळेल. यामुळे वेळेवर उपचार मिळाल्याने आरोग्य सुधारणा, रुग्ण समाधान, कार्यक्षमतेत वाढ आणि रोजगार निर्मिती झाल्याने जीवनमान उंचावण्यासाठी मदत होणार आहे. प्राथमिक स्तरावरचा खर्च वित्त मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्वानुसार केंद्र आणि राज्य सरकार विभागून घेतील.


लाभार्थींची संख्या –
आयुष्मान भारतराष्ट्रीय आरोग्य संरक्षण अभियान 10.74 कोटी गरीब, वंचित ग्रामीण कुटुंबाना आणि ताज्या सामाजिक आर्थिक जात निहाय जन गणनेनुसार शहरी भागातल्या सुचीबद्ध व्यावसायिक श्रेणीतल्या कामगार कुटुंबाना लक्षात घेऊन, त्यांना याचा लाभ मिळावा यासठी आखले गेले आहे.


व्याप्ती
सर्व राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशातल्या सर्व जिल्ह्यात ही योजना लागू करण्यात आली आहे.


धन्यवाद !

जय हिंद, जया महाराष्ट्र !!

Share And Rate This Article.

रूरल इलेकट्रीफिकेशन कॉर्पोरेशन

नुकतीच माझी निवड रूरल ईलेट्रेफिकेशन कॉर्पोरेशनच्या संचालक पदी करण्यात आली आहे.हे पद स्वीकारताना मला अत्यंत आनंद होत आहे. देशातील ग्रामीण भागात वीज पोहचण्याचे कार्य आता मी पार पाडणार आहे. ग्रामीण भागाचा विकास झाला तर देशाचा व राज्याचा विकास होईल हे निश्चित.

आरईसीचे कार्यक्षेत्र हे विस्तृत असून उत्कृष्ट दर्जेचे आहे. वाढीव वाढीसाठी आणि ग्रामीण व शहरी लोकसंख्येच्या जीवनमानाचा समृध्दतेसाठी विजेचे उपलब्धता सुलभ करण्यासाठी आरईसी कार्यरत आहोत. देशात वीजनिर्मिती, वीजसंरक्षण, वीज वितरण आणि वीज वितरण नेटवर्क समाविष्ट करणाऱ्या वीज प्रकल्पांना वित्तपुरवठा आणि प्रसार करण्यासाठी स्पर्धात्मक ग्राहक-अनुकूल आणि विकास आधारित संघटना म्हणून कार्य करते.

मराठवाडा विकास महामंडळाची जबाबदारी स्वीकारल्या नंतर मराठवाड्याचा अनुरोष भरून काढण्याचे कार्य मला पार पाडायचे आहे.
मराठवाड्याचा अनेक ग्रामीण भागात आजही वीज यौग्य प्रमाणात पोहचल्याली नाही मराठवाड्याला लागणाय्रा विजेच्या केवळ निम्मी विजेचीच निर्मिती आज होत आहे. वीज पुरवणा मुबलक व सुरळीत होण्यासाठी प्रथम वीजनिर्मितीचे स्तोत्र तयार करावे लागणार व त्यासाठी आपल्या विभागासाठी कुठला ऊर्जास्तोत्र हा उत्तम आहे जसे कि जलयुक्त शक्ती ऊर्जा, पवन ऊर्जा(Wind Power), औष्णिक ऊर्जा (Thermal Power) उष्मीय शक्ती (Coal Power), याचा अभ्यास करून त्यावर यौग्य मार्गदर्शन घेऊन त्यांची एक ब्लू प्रिंट बनवुन ती राज्य सरकारला सुपूर्द करणार. व त्यानुसार यौग्य तो ऊर्जा स्तोत्र निर्मितीची परवानगी राज्य सरकार कडून घेणार. झालेल्या नियुक्ती चा यौग्य वापर करत राज्य सरकारकडे हे स्तोत्र उभे करण्यास मुबलक पैसे नसल्यास तो आरईसी द्वारा उपलब्ध करून देणार व मराठवाड्यातिल गावागावात प्रत्येक व्यक्ती पर्यंत पोहचवण्याचे कार्य मी पार पाडणार.

गावागावात प्रत्येक घरात सर्व गरजूंना वीज मिळावी यासाठी जर माझा हातभार लागत असेल तर ते माझे भाग्य समजेल. आपल्या सर्वांच्या सहकार्याने मी इथवर पोहचलोय आपले प्रेम व सहकार्य मला सातत्याने सत्कार्य करण्याची प्रेरणा देत राहतील हीच सदिच्छा.
सबका साथ सबका विकास
जय हिंद!!

Share And Rate This Article.

मराठवाडा विकास मंडळ..माझी एक जबाबदारी.

मराठवाडा विकास मंडळाची स्थापना ३० एप्रिल १९९४ रोजी झाली. मा. राज्यपाल महाराष्ट्र राज्य यांनी दि. ५ सप्टेंबर २०११ रोजी सुधारित राजपत्र निर्गमित केले. या राजपत्रानुसार यथोचित बदल करून विकास मंडळाचे कार्य सुरु केले. मराठवाडा विकास मंडळाच्या बाबतीत, औरंगाबाद महसुली विभागातून महाराष्ट्र राज्य विधान मंडळाचा एक सदस्य असेल व त्याची मुदत अडीच वर्ष असेल. सदस्याने मुदत पूर्ण केल्यांनतर तो लागोपाठच्या मुदतीसाठी पात्र असणार नाही. मंडळाचा कार्यकाळ हा पाच वर्षांचा आहे.


मराठवाडा विकास मंडळाचे कार्य हे विस्तारित आहे. यामध्ये विभागाचा विकास आराखडा तयार करणे, केंद्र अथवा राज्य पुरस्कृत योजनांसाठी नियोजन विभागाकडून निधी उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करणे, कार्यान्वित योजनांचे पर्यवेक्षण, संनियंत्रण व मूल्यमापन करणे, मंडळ कार्यालयाचे बळकटीकरण करणे, विविध विषयांवर चर्चासत्र, कार्यशाळा आयोजित करणे व शिफारशी करणे, क्षेत्रीय भेटी आयोजित करणे, प्रशिक्षित मनुष्यबळ निर्माण करणे, असे ह्या सर्वच क्षेत्रांमध्ये मराठवाडा विकास मंडळाच्या कार्यकक्षा विस्तारलेल्या आहेत.


मंडळाचे कार्यक्षेत्र हे संपूर्ण मराठवाडा विभागासाठी असून त्यात औरंगाबाद महसूल विभागातील औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, बीड व उस्मानाबाद या जिल्हांचा समावेश आहे.ह्या जिल्ह्यातील विविध विकासात्मक कामाच्या संबंधात मंडळाच्या सर्वसाधारण बैठक घेण्यात येतात व सिंचन, रस्ते विकास, सामान्य आरोग्य, शिक्षण, तांत्रिक शिक्षण, वैद्यकीय शिक्षण, कृषी, सामाजिक सेवा क्षेत्र अशा विविध क्षेत्राच्या विकासात्मक कामाचा त्यात समावेश आहे.जोपर्यंत औद्योगिक असमतोल कमी होणार नाही तोपर्यंत प्रादेशिक असमतोल कमी होणे शक्य नाही असे मंडळास वाटते. त्यासाठी आर्थिक पायाभूत सुविधा जसे कि उत्तम रस्ते, रेल्वे, विमान सेवा, पाणी, वीज इत्यादी, त्याच बरोबर सामाजिक पायाभूत सुविधा जसे उत्तम शिक्षण संस्था, दवाखाने, कौशल्ययुक्त मनुष्यबळ इत्यादी निर्माण करणे गरजेचे आहे. त्यासाठी मंडळ कार्य करते. त्याच बरोबर तांत्रिक शिक्षणाच्या क्षेत्रातील अनुशेषामध्ये औद्योगिक प्रशिक्षण संस्था, माध्यमिक तंत्र शाळा व तंत्रनिकेतन या घटकांचा देखील समावेश आहे. आरोग्य सेवेच्या क्षेत्रामध्ये ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र, रुग्णवाहिका, उपकरणे व इतर साधनसामुग्री करीत तरतूद करून त्यानुसार जिल्हास निधी उपलब्ध होते.


मराठवाडा विभागातील अधिका-यांशी वेळोवेळी चारच्या करून कृषी विकासाच्या दृष्टीने येणाऱ्या सर्व अडचणींवर मात करण्याचा पुरेपूर प्रयत्न मी कारेन. त्यामध्ये डेअरी, शेतकरी उत्पादक कंपन्या, शेडनेट प्रकल्प अश्या शेतकऱयांशी निगडीत प्रकल्पांना योग्य तो निधी मिळवून देणे, ऊस ठिबक क्षेत्र, सौर ऊर्जा प्रकल्प व पाणी प्रश्न अश्या अनेक प्रश्नांवर तोडगा काढण्याचे काम मंडळ करते. कुठल्याही विभागाच्या विकासात रेल्वे नेटवर्क महत्वाची भूमिका बजावते आणि दुर्दैवाने मराठवाड्यात रेल्वेचे जाळे साधारण दर्जाचे आहे व रेल्वेचे प्रश्न सोडवणे हे मंडळाच्या विचाराधीन आहे. त्यामध्ये वैजापूर-पुणतांबा, औरंगाबाद-धुळे, मनमाड-मालेगाव, पाथरी-मानवत-परळी मार्ग अश्या अनेक कामांना मंजुरी मिळण्यासाठी मंडळाचे काम सुरु आहे.


मराठवाड्यात औद्योगिकरणाचे पायाभूत सुविधा म्हणून एम.एस.ई.बी. क्लस्टर स्थापित करून ग्रामीण भागातील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा मंडळाचा मानस आहे. एम.एस.ई.बी. क्लस्टरमध्ये कृषी आधारित उद्योग, कृषी साहाय्यकारी उद्योग, अन्न प्रक्रिया उद्योग कृषी आधारित अभियांत्रिकी उपक्रम स्थानिक आवश्यक्यता पूर्ण करण्यासाठी शालेय फर्निचर, ट्रेकटर बॉडी बिलडिंग, लेदर वर्क्स , दुग्धोप्तादन, गारमेंट इत्यादी सुविधा उपलब्ध केल्या जाऊ शकतात.


मराठवाड्यातील पर्यटन क्षेत्रांचा विकास करणे, पर्यटक माहिती केंद्र बनविणे, परदेशी पर्यटकांना चलन बदलण्यासाठी कार्यालय औरंगाबादला टुरिस्ट हब बनविणे. पैठणचे नाथ उद्यान जे बऱ्याच वर्षांपासून बंद आहे त्याचा विकास करून सुरु करणे, तेथे पर्यटन वाढल्यास शासनास चांगला महसूल मिळू शकतो व जिल्ह्याचा देखील विकास होऊ शकतो.


असे अनेक क्षेत्र जे अविकसित आहेत त्यांना निधी मिळवून देण्याचे व मराठवाड्याचा सर्वतोपरी विकास करण्याचे काम मी करणार आहे व मराठवाड्यावर आता या पुढे कुठलाही अन्याय होऊ देणार नाही. आपण सर्वांनी मला या कार्यास साथ द्यावी व आपले काही विचार, सूचना असल्यास त्या माझ्यापर्यंत नक्कीच पोहचावा, मी सदैव आपल्या सेवेत राहीन.
धन्यवाद !
जय हिंद, जया महाराष्ट्र !!

-डॉ. भागवत कराड

Share and Rate This Article.

भारतरत्न डॉ. भीमराव रामजी आंबेडकर

भारतरत्न डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांचा जन्म १८९१ मध्ये महू मध्यप्रदेश येथे झाला. शिक्षणासाठी शिष्यवृत्तीच्या आधारे अमेरिकेला गेले. परदेशात असतांनाच त्यांना कोलंबिया विद्यापीठाने पी.एच.डी. हि पदवी बहाल केली. १९२५ मध्ये त्यांनी हि डॉक्टरेट पदवी मिळवली, त्याचा विषय होता “नॅशनल डिव्हिडंड ऑफ इंडिया- ए हिस्टोरिकल अँड अँनॅलिटिकल स्टडी.” त्याच बरोबर कोलंबिया विद्यापीठात त्यांनी समाजशास्त्र, राज्यशास्त्र व अर्थशास्त्र याविषयांचे अध्ययन केले. पुढे त्यांनी लंडन विद्यापीठात डि. एस्सी. हि पदवी मिळवली.

तत्कालीन प्रखर अश्या सामाजिक विषमतेमुळे बालपणीच त्यांच्या मनावर वाईट प्रतिबिंब कोरल्या गेले. त्यामूळे भारतात आल्यानंतर सामाजिक विषमता दूर करण्याच्या हेतूने त्यांनी कार्य केले .व त्यासाठी त्यांनी मूकनायक ,बहिष्कृत भारत ,जनता ,आणि प्रबुद्ध भारत अशी वृत्तपत्रे चालवली.त्या काळात भारतात प्रसिद्ध होणाऱ्या वृत्तपत्रात अस्पृशांचे प्रश्न मांडले जात नव्हते.त्यामुळे डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र वृत्तपत्रांची निर्मिती केली, त्यातून ते सामाजिक विषमता,राजकीय घडामोडी व नवीन समाजाची निर्मिती या अनुषंगाने लिखाण करत.विशेष म्हणजे त्यांनी कधीही ह्या वृत्तपत्रांचा वापर आपल्या स्वतः च्या पक्षाची ध्येयधोरणे राबवण्यासाठी केला नाही. त्यांचे लिखाण केवळ अस्पृश्यच नव्हे तर स्पृश्य समाजाच्या लोकांना देखील विचार करायला लावणारे होते.याशिवाय समाज उन्नती साठी त्यांनी अनेक ग्रंथही लिहलेत.सर्व माणसे सामान आहेत कोणी उच्च नाही व कोणी निचही नाही असे त्यांचे स्पष्ट मत होते.ते कर्ते समाज सुधारक होते आपल्या प्रत्येक कृतीतून त्यांनी समानतेचे धडे दिलेत .


जातीय उतरंड, चातुर्वर्ण्य व्यवस्था या व्यवस्थेत शूद्र मानल्या जाणाऱ्या जातीवर होणारे अत्याचार याबाबत त्यांच्या मनात विलक्षण चीड होती.त्यांनी नेहमीच त्यांच्या कृतीतून समानतेचे तत्व बिंबवले.त्यांनी दाखवून दिले कि शिक्षण घेऊन ते सुशिक्षित झाले असले तरी समाजबांधवांना ते विसरलेले नाहीत. त्यांचे दुःख दूर करण्यासाठी बाबासाहेबांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. तत्कालीन अस्पृशांमधील आत्मविश्वास वाढवण्यासाठी व त्यांच्या हक्कासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी १९३० ला नाशिक येथे काळाराम मंदिर प्रवेशाचा सत्याग्रह सुरु केला. मंदिरात जर अस्पृश्य लोकांना प्रवेश मिळाला तर त्यांचा अस्पृश्यतेचा प्रश्न सुटण्यास हातभार लागेल हा त्या मागचा उद्देश होता.१९२७ मध्ये महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह त्यांनी केला .अस्पृश्य लोकांना तळ्यावर पाणी भरण्यास मनाई होती, त्यांना तळ्याचे पाणी भरता यावे ह्यासाठी हि लढाई होती. ह्या वर्ण व्यवस्थेचे समर्थन करणाऱ्या मनुस्मृती या ग्रंथाचे त्यांनी जाहीर दहनही केले.


प्रथमतः त्यांनी हिंदू धर्मात राहून अस्पृश्यता मिटवण्याचा प्रयत्न केला परंतु आपले लक्ष साध्य होत नाही व न्याय मिळत नाही हे लक्षात आल्यावर १९५६ मध्ये त्यांनी नागपूर येथे ५ लाख अस्पृश्य बांधवांसोबत बौद्ध धर्माचा स्वीकार केला व बौद्ध धर्माची दीक्षा घेऊन धर्म -परिवर्तनाची घोषणा प्रत्यक्षात आणली.


डॉ बाबासाहेब आंबेडकर हे फक्त अस्पृश्यच्या हक्कासाठी लढले असे नाही तर हिंदू स्त्रियांना सामाजिक प्रतिष्ठा,संपत्तीतील हक्क,घटस्फोट इ बाबतीत स्वतंत्र मिळावे म्हणून त्यांनी हिंदू कोड बिल संसदेत मांडले परंतु ते नामंजूर झाल्याने त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामाही दिला.१९३० सालच्या गोलमेज परिषदेत त्यांनी ब्रिटीशांना भारत सोडा असा इशाराही दिला. डॉ बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय कृषी व्यवस्थेची देखील चांगली जाण होती. पूर्वीच्या काळी “खोती” पद्धत अस्तित्वात होती. ही एक प्रकारची शोषण करणारी व्यवस्था होती. ती खोती पद्धत नष्ट करणारे कायदे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेत.


१९४७ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे स्वतंत्र भारताचे न्यायमंत्री झाले, नंतर भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली. राज्य घटनेच्या निर्मितीमधील त्यांचे योगदान हे कदापीही विसरण्याजोगे नाही, म्हणूनच राज्य घटनेचे शिल्पकार म्हणून त्यांना संबोधले जाते. असे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ६ डिसेंबर १९५६ ला हे जग सोडून गेले. परंतु त्यांचे विचार आजही आपणास प्रेरित करतात. अशा या महामानवाला त्रिवार अभिवादन !!!

 

Share And Rate This Article.

महिला सबलीकरण एक स्वप्न

भारतीय संस्कृतीत पूर्वीपासुनच स्त्रीयांना अन्यन्य साधारण महत्व आहे. भारतीय तत्वानुसार अस्तित्वाच्या त्रिकोणाच्या पायाच्या एका टोकाला पायाभूत सुविधासमृद्धी देणारी लक्ष्मी, दुसऱ्या टोकाला संरक्षणशक्ती देणारी महाकाली आणि शिरोबिंदु मध्ये ज्ञान, विचार देणारी महासरस्वती असते. अशा प्रकारे ह्या तीन शक्तीना विशेष स्थान दिलेले आहे. इतके अगाध तत्वज्ञान भारतीय शाखात मांडलेले असुन सुद्धा आजच्या महिला सक्षम आहेत का? असा प्रश्न वारंवार उभा राहतो. उच्चशिक्षित असणे, नोकरी करणे किंवा पाहिजे ते कपडे घालण्याची मुभा असणे म्हणजे स्त्री स्वातंत्र्य आहे का ? हे सगळे म्हणजे स्त्री ध्येय आहे का ? भारतीय स्त्रीया ह्या पलीकडे पाऊल कधी टाकणार ? हे प्रश्न आजही आहेत.

आज बरीच सुधारणा स्त्री शिक्षणात झालेली आपल्याला दिसते. आई-वडीत मुलींना उच्च शिक्षण देण्यासाठी आग्रही असल्याचेही आपण पाहत आहोत मात्र ह्या उच्चशिक्षित मुलींना देखीत लग्नाच्या बोहल्यावर मी लग्न झाल्यावरही काम करणार अशी परवानगीवजा पूर्वकल्पना द्यावी लागते. तिच्या आयुष्यातील कुठलेही निर्णय मग ते छोटे असोत वा मोठे ते घेण्याचे पाठबळ आपण तिला देतो का? आजही आपल्या समाजात स्त्रीया रोजच्या जीवनातील समस्यांसाठी आपल्या नवऱ्यावर किंवा वडीलांवर अवलंबुन आहोत. एवढेच नव्हे तर छोटया समस्या असो किंवा स्वतःच्या मातृत्वाच्या निर्णयापर्यंत कित्येक निर्णय घेण्याची क्षमता महिलांमध्ये नक्कीच असते. पण त्यांना ते निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य आजही समाजातुन मिळत नाही हे तेवढेच खरे. तसं पाहता समाजातील स्वतःचे न्यायस्थान जगभरात कुठेही भारतातील महिलांना पुरुषांप्रमाणे उक्त मिळाले नाही.

आज महिला स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव करूना देण्यासाठी विविध क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खादा लावून काम करत आहेत व बऱ्याच अंशी यश देखील संपादन करत आहेत. खर तर संधीवचीत महिलांना कोणत्याही भेदभावाशिवाय प्रगती करण्याची संधी मिळणे म्हणजे महिला सबलीकरण, महिलांना कोणाची दया किया किंव नको तर, त्यांना पुरुषाप्रमाणे सम्मान संधी हवी आहे. दुर्बलता नष्ट करणारी, मानव बुद्धीमध्ये स्वत्वाची जाणीव व स्वतः बहुत जागरूकता निर्माण करणारी व त्यादृष्टीने स्वयंविकासासाठी प्रवृत्त करणारी एक संकल्पना म्हणजे महिला सक्तीकरण भारतीय संस्कृतीच्या इतिहासाची पाने उत्तगदन पाहिली तर एक गोष्ट लक्षात येते की पूर्व कालखंडात स्त्रीयांना पुरुषांच्या बरोबरीचे स्थान होते. मात्र आजच्या समाजातील स्त्रीयांचे स्थान काय याचा विचार केला तर एक गोष्ट लक्षात येते. मातृसत्ताक कुटुंब पद्धतीने जिथे घरातील सर्व अधिकार महिलाकडे आहेत. तर सामाजिक जीवनात तिच्या विचाराचा लवलेशहि नाही.

एक मनुष्य म्हणुन आपण स्त्रीकडे कधी पाहिलच नाही हे खर वास्तव आहे. पूर्वीपेक्षा आजचं चित्र निःसंचय सुखावह आहे. पूर्वीची प्रतिमा आता विस्तारली आहे. सामान्य गृहीणीपासुन डॉक्टर राजकारण, विधी तज्ञ, लेखिका उद्योजिका, अंतराळवीर, पत्रकार अशा अनेक क्षेत्रात स्त्रीयांनी आपले स्वतःचे अस्तित्व निर्माण केले आहे. तरी आपण एका पायरीवर अडकून पडलो आहोत. तिथुन पुढे पाऊल टाकणे आत्ता महत्वाचे आहे. ते फक्त महिलानीच टाकण्यापेक्षा सर्व समाजाने एकत्र टाकायला हवे. मुळात जी नैसर्गिकदृष्टया सबला आहे व जी अबला कधीच नव्हती तीला आपण अबला केले तीला आत पुन्हा सबला करण्यात आपण गुतलेलो आहे.

आजपर्यंत सरकारने महिला सबलीकरणासाठी अनेक योजना राबल्या मात्र हे ध्येय जर पूर्ण न्यायचे असेल तर त्याची सुरवात प्रत्येकाला आपल्या घरापासून करावी लागेल. स्त्री म्हणजे अबला हि एक मानसिकता झालेली आहे. तिला बदलावी लागेल. ह्यासाठी जर प्रत्येकाने पुढाकार घेतला तर आपण स्त्रियांना त्याचे क्षितीज मिळण्यास नक्कीच यश मिळवून देऊ शकतो. या महिला दिनानिमित्त आपण सर्वानी मिळून संकल्प करूयात महिला सबलीकरणाच्या जागतिक महिला दिनाच्या सर्व माता भगिनींना हार्दिक शुभेच्छा !

Share And Rate This Article.

लोकनेते गोपीनाथ मुंडे

माझ्या आठवणीतला एक असा प्रसंग मांडावासा वाटतो की, ज्यात एका अशा नेत्याचे दर्शन घडते जो की, सतत कार्यकर्त्यांच्या पाठीशी राहिला. कार्यकर्त्यांवर आलेलं संकट त्याने नेहमीच स्वतः चे समजले. संभाजीनगर येथे ऊसतोड आंदोलन शेतक-यांच्या ऊसाला भाव मिळावा म्हणुन करण्यात आले. त्या आंदोलनात हजारोच्या संख्येने शेतकरी वर्ग उपस्थित होता. परंतु परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यामुळे पोलीसांना लाठीचार्ज करावा लागला व माझ्यासह अन्य कार्यकर्ते गंभीर जखमी झाले. त्याप्रसंगी एकही क्षण विचार न करता त्या नेत्याने सर्वांना शासकीय रुग्णालयात नेले व सर्वांचा इलाज होईपर्यंत जातीने तिथे थांबले. स्वतः खुप जखमी असतांना देखील स्वतः चे दु:ख विसरुन त्यांनी कार्यकर्त्यांना सांभाळले, सर्वांची आपुलकीने काळजी करणारा असा नेता आम्हांला लाभला ह्या पेक्षा सौभाग्य ते काय ! तो नेता म्हणजे अर्थातच लोकनेते दिवंगत मा. श्री. गोपीनाथरावजी मुंडे साहेब !

विद्यार्थी चळवळीतील कार्यकर्ता, आमदार, उपमुख्यमंत्री, खासदार ते केंद्रीय मंत्री अशी उंची गाठलेले महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरील शक्तीशाली नेते आणि शेतमजुर – शेतक-यांसाठी लढणारे खरे लोकनेते म्हणजे गोपीनाथ मुंडे! कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसतांना महाराष्ट्रभर भाजपाचा झेंडा संघर्ष करत त्यांनी रोवला. गेल्या साडे तीन दशकात बहुजनांचे आधार व पक्षाचा चेहरा बनलेले मुंडे साहेब यांच्या अचानक निधनाने संपुर्ण महाराष्ट्र हळहळला व महाराष्ट्राचे राजकारण वेगळ्या दिशेने कलाटणी घेण्यास सुरवात झाली.

साहेब तुमच्या शिवाय महाराष्ट्राचे राजकारण ही कल्पना सामान्यातला सामान्य माणुस सुद्धा करू शकत नव्हता. तुम्ही सांसदीय लोकशाहीच्या मुख्य प्रवाहापासुन लांब असलेल्या जाती-समुहांची मोट बांधली. महाराष्ट्राच्या राजकारणात स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले. राजकारणाला समाजकारणाची जोड असली पाहीजे असं नुसतं बोललं जातं. मुंडे साहेबांनी मात्र आपल्या राजकीय वाटचालीला समाजकारणाची जोड दिली. त्यांनी कधीही कोणत्याही टप्प्यावर तडजोड केली नाही. सत्तेच्या प्रलोभनाला बळी पडले नाही किंवा सत्तेच्या ताकदीपुढं झुकलेही नाहीत. वादळीबेदरकार स्वभाव असल्याने गणपती दुध पिण्याच्या कृतीचे अवैज्ञानिक समर्थन करणा-या स्वतःच्या पक्षाच्या मुख्यमंत्र्यालाही फटकारण्याचा बेडरपणा मुंडे साहेबांत होता.प्रचंड राजकीय समन्वयवादी दृष्टी आणि लोकसंग्रह यामुळे ते लोकनेता झालेत.

नव्या राजकारणात कार्यकर्त्यांना उभं करण्याऐवजी त्यांना मिंधे करण्यावर भर दिला जातो. पण मुंडे साहेब अशा राजकारणापासुन दुर राहिले, त्यांनी माणसं उभी केली, माणसं जपली, कार्यकर्ते घडवले आणि एक नवा आदर्श उभा केला. अशाप्रकारे लोकांच्या मनात घर केल्यामुळे जनतेचे खरे लोकनेते ठरले. लोकसंपर्क अन्यायाविरुद्ध संघर्षाची नुसतीच तयारी नव्हे तर जिद्द, नवा विचार, नवे तंत्रज्ञान एकुणच जे नवे चांगले ते हवे, असा उत्साह असलेले नेते मुंडे साहेब यांनी भाजपाला जनमाणसात स्थान मिळवुन दिले. रुढार्थाने महाराष्ट्राची भुमी भाजप चळवळीस फारशी अनुकूल नसताना राज्यात भाजपचा झेंडा सातत्याने फडकवत ठेवणारे व एकुणच सिंहाचा वाटा उचलणारे नेते म्हणुन त्यांची ओळख अवघ्या महाराष्ट्राला आहे.­­

महाराष्ट्राच्या राजकारणात प्रभाव पाडतील असे हाताच्या बोटावर मोजण्याइतके मोजके नेते आहेत. त्यात मुंडे साहेब ठळकपणे उठुन दिसतात. त्यांची प्रतीमा कायमचं अत्यंत पुरोगामी आणि सर्वसमावेशक राहिली. महाराष्ट्राच्या प्रश्नांची जाण आणि सामाजिक भान ठेवुन त्यांनी सतत काम केले. राज्यातील प्रश्न सोडवण्याची तळमळ आणि त्यासाठी अथक मेहनत घेण्याची तयारी तसेच प्रसंगी रस्त्यावर उतरण्याची धडाडी, याचबरोबर कार्यकर्त्यांचे आणि लोकांचे संघटन करण्याचे कौशल्य, संसदीय कामकाजाचा गाठा अभ्यास, अत्यंत प्रभावी वक्तृत्व आणि कर्तृत्व असे सर्वगुणसंपन्न नेतृत्व महाराष्ट्राला लाभले हे महाराष्ट्राचे भाग्य असेच म्हणावे लागेल.

मा. मुंडे साहेबांच्या कार्याचे अनुकरण करीत मी नेहमीच मार्गक्रमण करत आहे. तळागाळातील जनतेला सुखी करण्याचे व त्यांना समृद्ध करण्याचे स्वप्न मुंडे साहेबांनी पाहिले होते. परंतु काळाने आज त्यांना आपल्यातून हेरावून नेले. मात्र त्यांनी दिलेली शिकवण कायम लक्षात ठेवून त्यांचे प्रत्येक स्वप्न पूर्ण करण्यास मी कायम कठीबद्ध राहील. मुंडे साहेबांची भुमिका, विचारधारा व कार्यपद्धती यांचे अवलोकन करुन सतत त्यांना अवलंबण्याचा प्रयत्न माझा राहील.

Share And Rate This Article.

मी एक महाराष्ट्रातील लाभार्थी

फडणवीस सरकारची ३ वर्षे म्हणजे राज्याच्या नव्या आत्मविश्वासाची, प्रगतीच्या ध्यासाची व पारदर्शी कारभाराची. ह्या तीन वर्षात महाराष्ट्र सरकारने दाखवुन दिले. ह्या तीन वर्षात सरकारने यशस्वीपणे आव्हान पेलत राज्याला विकासाच्या मार्गावर आणले आहे. अर्थात हे सर्व घडण्यासाठी सरकारला अनेक अडचणींना व आव्हानांना तोंड द्यावे लागले. जसे की राज्यावर असलेला कर्जाचा डोंगर, शेतकरी आत्महत्यांची मोठी संख्या, शेती विकासाचे घटते दर, सिंचन व्यवस्था, रस्त्यांची दुर्दशा, विजेचा खेळखंडोबा, वाढती बेरोजगारी यांसारख्या अनेक गोष्टी मागील मागील सरकारकडुन विद्यमान सरकारला वारसा म्हणुन मिळाल्या होत्या. मात्र तरीही हे सरकार डगमगले नाही तर, दमदार पावले टाकत गेल्या तीन वर्षात राज्याला नव्या उंचीवर नेण्याचे काम भाजपा सरकारने केले.


कोणत्याही राज्याच्या विकासात तीन गोष्टी महत्वाच्या असतात. शेती, उद्योग व सेवा क्षेत्राचा विकास. या तीनही क्षेत्रात विद्यमान सरकारने भरीव कामगिरी केलेली आहे. उगाच तोंडकौतुक केल्यापेक्षा आकडेवारी समोर ठेवुन झालेला बदल लक्षात घेऊ पुर्वीच्या सरकारच्या कार्यकाळात शेतीचा विकासदर हा उणे ११ % इतका होता. मात्र भाजप सरकारने शेतीत गुंतवणुक वाठवली आणि शेतीचा विकासाचा दर उणे ११ % वरुन अधिक १२.५ % (टक्के) वर नेला. २०१६-२०१७ मध्ये शेतीत क्षेत्रात ५६ हजार कोटींची गुंतवणुक केली. जलयुक्त शिवारसारख्या प्रभावी योजना राबवल्या. या योजनेने तर महाराष्ट्रात अक्षरश: क्रांती घडवुन आणली. पाणी जमिनीत मुरल्यामुळे पाण्याची पातळी वाढली व त्यामुळे दरवर्षी टँकरवर अवलंबुन असणारी गावांची संख्या प्रचंड प्रमाणात कमी झाली. शेतीला पाणीपुरवठा वाठल्याने फायदा झाला.


सर्वात महत्वाचा उपाय म्हणजे शेतक-यांसाठी देशातील आजपर्यंतची सर्वात मोठी कर्जमाफी करण्याचा निर्णय या सरकारने घेतला. पहिल्या टप्प्यातील ४,००० कोटींची कर्जमाफी पुर्ण देखील झाली. शेतीमालाला सर्वाधिक हमीभाव या तीन वर्षात मिळालाच, पण शेतक-यांना हवे तिथे माल विकण्याचा अधिकारही फडणवीस सरकारने दिला. शेती सुधारणांमध्ये महाराष्ट्राचा पहिला नंबर असल्याचे निती आयोगाच्या जुलै २०१७ च्या अहवालात म्हटले आहे.


उद्योग क्षेत्रात देखील भरीव कामगिरी ह्याच सरकारच्या कारगिरर्दीत झाली. मेक इन इंडीयाच्या माध्यमातुन राज्यात मोठ्या प्रमाणात उद्योग व गुंतवणुक वाढत आहे. २०१६ – २०१७ मध्ये २ लाख २० हजार कोटींची गुंतवणुक या राज्यात झाली. जे की देशाच्या एकुण गुंतवणुकीच्या ५० टक्के आहे. अनेक मोठे उद्योग बाहेरुन राज्यात येत आहे. त्यामुळे राज्याची प्रतिमा देखील सुधारली आहे. इतकेच नव्हे तर ह्या सरकारच्या नियोजनबद्ध धोरणाने पायाभुत सुविधांमध्ये देखील बदल दिसायला लागला. कायदा व सुव्यवस्था मध्ये बदल घडत आहेत. त्यासाठी अनेक महत्वपुर्ण निर्णय ह्या सरकारने घेतले. फॉरेन्सिक लॅबची संख्या वाढवण्यात आली, आरोपपत्र गुणवत्ता तपासणी यंत्रणा तयार करण्यात आली. प्रमुख शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले. शिवाय पोलीस स्टेशनस ऑनलाईन जोडण्यात आलीत.


ह्याच बरोबर समृद्धी महामार्ग, विजेचा प्रश्नमार्गी लावणे, स्वच्छतागृहे, जात प्रमाणपत्र मिळणे सुलभ करणे, सिंचन प्रकल्पासाठी मोठे पाऊल, घरकुल योजना, अन्नप्रक्रिया धोरणास मंजुरी अशी बरीच राज्याच्या हिताची कामे ह्या सरकारने मार्गी लावलीत. मुख्य म्हणजे राज्याची विस्कटलेली अवस्था भाजपा सरकारने पुन्हा रुळावर आणली. मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस ह्यांच्या प्रामाणिक इच्छा शक्तीमुळे अनेक सकारात्मक बदल महाराष्ट्र राज्यात घडुन आलेत. त्यांची दुरदृष्टी व मार्गदर्शन यांच्या बळावर महाराष्ट्र राज्याच्या हिताचे प्रत्येक उद्दिष्ट साध्य होईल हा विश्वास महाराष्ट्रातील प्रत्येक माणसात आहे.
जय हिंद, जय महाराष्ट्र !

Share and Rate This Article.

 

फडणवीस सरकारची ३ वर्षे

फडणवीस सरकारची वर्षे म्हणजे राज्याच्या नव्या आत्मविश्वासाची, प्रगतीच्या ध्यासाची व पारदर्शी कारभाराची. महाराष्ट्र राज्याचे भवितव्य उज्ज्वल आहे हे सरकारने गेल्या तीन वर्षात दाखवुन दिले व त्याचे सकारात्मक परिणाम आपण सर्वच अनुभवत आहोत. व यापुढे भाजप सरकारच्या नेतृत्वाखाली राज्याच्या विकासाचा आलेख अधिकाअधिक उंचावत राहणार आहे.


अर्थात हे सर्व घडण्यासाठी फडणवीस सरकारला अनेक अडचणींना व आव्हानांना तोंड द्यावे लागले. त्यामध्ये महत्वाचे म्हणजे राज्यात होणा-या शेतकरी आत्महत्या, शेतक-यांची कर्जमाफी व मराठा आरक्षणाचा मुद्दा मात्र मा. श्री. मुख्यमंत्री यांनी समाजातील सर्वच स्तरांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रगतीशील परिवर्तन घडुन आणलेले आहे. शेतक-यांची पहिल्या टप्प्यातील ४,००० कोटींची कर्जमाफी ही पुर्ण देखील झाली. जलयुक्त शिवार या योजनेने मराठवाड्यातील मोठा पाणी प्रश्न मार्गी लावला. लातुरला ऐन गरजेच्या वेळी ट्रेनने पिण्याचे पाणी पुरवण्याचा निर्णय ह्याच सरकारने घेतला. त्यातच ह्या तीन वर्षात सरकारचा मित्र पक्ष असलेली शिवसेनेने सरकारच्या प्रत्येकच योजनेस वारंवार विरोधच केला. तेव्हा शिवसेना हा युतीतील घटक पक्ष आहे की, प्रतिस्पर्धी असा प्रश्न पडावा इतकी टीका सेनेने भाजपावर व मुख्यमंत्र्यांवर केली मात्र भाजपने ते सर्व झेलत राज्यात विकास कामे मार्गी लावली व पुढील येणा-या वर्षात अनेक विकासकामांच्या योजनेंना गती मिळणार हे नक्की.


ह्या तीन वर्षात राज्यात जिल्हा परिषद, नगरपालिका व ग्रामपंचायत निवडणुका झाल्यात ह्या सर्वच निवडणुकीत पुर्वी भाजपा हा चौथ्या नंबरचा पक्ष होता मात्र, आज तो पहिल्या नंबरचा पक्ष झालाय. यासाठी राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस व प्रदेशाअध्यक्ष श्री. रावसाहेब दानवे यांना श्रेय द्यायलाच हवे.


समृद्धी महामार्ग, विजेचा प्रश्न मार्गी लावणे, स्वच्छतागृहे, जात प्रमाणपत्र मिळणे सुलभ करणे, सिंचन प्रकल्पांसाठी मोठे पाऊल, घरकुल योजना, अन्नप्रक्रिया धोरणास मंजुरी अशी बरीच राज्याच्या हिताची कामे ह्या सरकारने मार्गी लावलीत व त्यातील काही पुर्णत्वास देखील नेली आहेत.


मा. श्री. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या रुपात एक प्रामाणिक आणि कुशल नेतृत्व राज्याला भेटले आहे व जनतेने देखील ह्या सरकारवर विश्वास दाखवला आहे. सर्वसामान्यांच्या उन्नतीसाठी दुरदृष्टीने कार्यरत असलेल्या ह्या भाजपा सरकारला जनतेने दिलेले प्रेम ह्यावर हे सरकार पुढेही खरे उतरेल यात काही शंकाच नाही.  मुख्यमंत्री मा. श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वापुढे राज्यहिताच्या विरोधात जाणारे कोणतेही आव्हान टिकु शकणार नाही. त्यांची दुरदृष्टी व मार्गदर्शन यांच्या बळावर महाराष्ट्र राज्याच्या हिताचे प्रत्येक उद्दिष्ट आपण साध्य करु हा विश्वास मला आहे.
जय हिंद, जय महाराष्ट्र !

Share And Rate This Article

भाजपची विजयी पताका !

राज्यातील १६ जिल्ह्यांतील ३,१३१ ग्रामपंचायती व थेट सरपंचपदासाठी शनिवारी झालेल्या निवडणुकांचे निकाल सोमवारी जाहीर झाले व पुन्हा एकदा भाजपने आपली विजयी पताका फडकवत राज्यात पहिल्या क्रमांकाचा मान पटकावला.भाजपा सरकार हे श्रीमंतांचे सरकार आहे, शहरातील लोकांसाठी काम करते व विशेष स्तरावरील लोकांसाठी हे सरकार काम करते असे आरोप विरोधी पक्ष कायमच करत आलेले आहेत. परंतु ग्रामपंचायत निवडणुकांत हे लक्षात आले की, प्रत्येक गावागावांत कमळ फुलले आहे. सामान्य जनमाणसात भाजपा वर विश्वास आहे. भाजपाने गावांतील लोकांसाठी केलेली विकास कामे ही नक्कीच लोकांच्या मनात रुजली आहेत.

जनतेने पुन्हा एकदा भाजपाला निवडून आणुन हे दाखवुन दिले की, जाती-पातीचे राजकारण सामान्यजनतेला नकोय तर, कारण विकास हवा आहे. भाजपाने केलेला विकास व पुढील वर्षातील त्यांचे नियोजन यावर जनतेने विश्वास दाखवुन इतरही पक्षांना हा संदेश दिला आहे की, जातीकारण नकोय विकास हवा आहे ?

आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांचे व्यक्तीमत्व पारदर्शी असुन केलेल्या कामाची जबाबदारी घेणे अर्थात उत्तरदायित्वाचा मुल्यांवर त्यांचा विस्वास आहे. तसेच गरीब-श्रीमंत भेद, जाती-समुदायांमधील भेदभाव हे सर्व ध्यानात घेता, राज्यात अनेकतेतुन एकता असण्याऐवजी अनेकतेतुन विविधता आहे असे त्यांना वाटते. केवळ काहीच लोकांना नव्हे तर, प्रत्येकाला विकासाची फळे मिळावीत ह्यासाठी ते कायम प्रयत्नरत आहेत व त्यांच्या त्याच प्रयत्नांना जनतेने देखील पावती देत ग्रापंचायतीत सर्वाधिक मताधक्क्याने भाजपाला निवडुन दिले. तसेच राज्याचे प्रदेशअध्यक्ष मा. श्री रावसाहेब दानवे यांनी घेतलेली मेहनत व केलेली विकास कामे ह्यांची दखल सामान्य जनतेने घेतली व भाजपाला नं. १ चा पक्ष बनवला मात्र प्रदेशअध्यक्षांनी याचे श्रेय न घेता गावस्तरावर काम करणा-या भाजपच्या कार्यकर्त्यांना दिले. तिकडे पंकजाताईंनी पक्षासाठी अनेक कामे करत विजयात मोठा हातभार लावला.


मा. श्री. प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी ह्यांच्या ”सबका साथ, सबका विकास” ह्या धोरणाची अंमलबजावणी करत भाजपाच्या सर्व नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी जी काही विकास कामे ह्या तीन वर्षात पार पाडली. त्या सर्व कामांची योग्य अशी पावती सर्व सामान्य जनतेने भाजपाला देत प्रचंड मतांनी विजयी केले व घराघरात कमळ फुलले. त्याबद्दल जनतेचे आभार !


विकास, विकास आणि फक्त विकास, भाजपाचा एकच ध्यास !

 

Share and Rate This Article.

कर्मभूमी नाही तर जन्मभूमी बोलावते

भगवान बाबांची जन्मस्थळाची माती माथी लावुन नवा अध्याय सुरु करते, असे भावुक आव्हान आपल्या सर्वांच्या लाडक्या पंकजाताईंनी केली व लाखो समर्थक सावरगाव घाट येथे एकत्रित झालेत ”केवळ दिवंगत गोपीनाथ मुंडेच्या पुण्याईमुळेच पंकजा” असे हिणवणा-यांना पुन्हा एकदा आपले कर्तृत्व सिद्ध करत पंकजाताईंनी सडेतोड उत्तर दिले.पंकजाताई यांनी भगवानगडाच्या मान राखत ”माहेरच्या लेकीला भगवान गडावर वीस मिनटे द्या” अशी कळकळीची विनंती महंत नामदेव शास्त्री यांना केली मात्र त्यांनी ती विनंती फेटाळली.

संत भगवान बाबा हे वंचित आणि उपेक्षित समाजाचे श्रद्धास्थान म्हणुन ओळखले जातात. समाजातील उपेक्षित आणि वंचित लोकांसाठी त्याग आणि अपेष्ठा सहन करून संत भगवान बाबा ह्यांनी समाजाला शिक्षणाचे दरवाजे खुले करून दिलेत. त्यामुळे बाबा समाजाचे सर्वश्रेष्ठ श्रद्धास्थान बनले पुढे त्यांचे हा समाज कार्याचा वारसा दिवंगत नेते गोपीनाथजी मुंडे यांनी चालवला व समाजाने देखील त्यांना सर्वाधिक प्रेम व पाठबळ दिले. संत भगवान बाबांच्या विचारातुन प्रेरणा घेऊन त्यांची कर्मभूमी असलेल्या भगवान गडावरूनच मा. श्री. गोपीनाथजी मुंडे यांना समाजाची वज्रमुठ आणि ताकद अख्या महाराष्ट्राला दाखवुन दिली. व आज हाच वारसा समोर पंकजा ताईंनी संत भगवान बाबांच्या आशीर्वादाने पुढे नेण्याचा ध्यास घेतला, मात्र त्यांच्या मार्गात अडथळे निर्माण झाले.

भगवान गडावरून राजकीय भाषण नको ह्या भूमिकेतुन महंत नामदेव शास्त्री ह्यांनी पकंजाताईंचा विरोध केला. मात्र सामाजिक भान ठेवत पंकजाताईंनी कुठलाही हट्ट केला नाही. हा वारसा सामोरतर न्यायचाच आहे. समाजातील उपेक्षितांसाठी कार्य करायचेच आहे. परंतु ज्या भगवानगडाला आपण आदर्श मानतो, जे आपले श्रद्धास्थान आहे, तेथे कुठलीही हिंसा नको, अशी उदार भावना ताईंनी दाखवली व सर्व समाजाला सावरगाव घाट येथे एकत्रित होण्याचे आव्हान केले.

भगवान बाबांनी सुरु केलेल्या दसरा मेळाव्याला दिवंगत नेते गोपीनाथजी मुंडे यांनी नव्या उंचीवर नेले व आज त्यांची कन्या म्हणुन समाजाला एक योग्य अहिंसेचा मार्ग दाखवत पंकजाताईंनी जे कार्य ते समाजातील प्रत्येकाला प्रेरणा देणारे आहे. ताई तुम्ही साहेबांचे प्रत्येक स्वप्न पुर्ण कराल व परत एकदा अवघ्या महाराष्ट्राला आपली वज्रमुठ दाखवाल हीच खात्री माझ्या सारख्या प्रत्येक समर्थकाला आहे.

Share And Rate This Article.

Social Connect

Get in touch with Us

If you've any enquirey, let us know we'll call you back.

NGA Branding India Pvt. Ltd.

Office:

NGA, C-38, Front lane of MIT Hospital, Sector N 4, Cidco, Aurangabad, Maharashtra 431005

+91 96238 14222

Email: info@nga.co.in

Website: www.nga.co.in