भगवान बाबांची जन्मस्थळाची माती माथी लावुन नवा अध्याय सुरु करते, असे भावुक आव्हान आपल्या सर्वांच्या लाडक्या पंकजाताईंनी केली व लाखो समर्थक सावरगाव घाट येथे एकत्रित झालेत ”केवळ दिवंगत गोपीनाथ मुंडेच्या पुण्याईमुळेच पंकजा” असे हिणवणा-यांना पुन्हा एकदा आपले कर्तृत्व सिद्ध करत पंकजाताईंनी सडेतोड उत्तर दिले.पंकजाताई यांनी भगवानगडाच्या मान राखत ”माहेरच्या लेकीला भगवान गडावर वीस मिनटे द्या” अशी कळकळीची विनंती महंत नामदेव शास्त्री यांना केली मात्र त्यांनी ती विनंती फेटाळली.
संत भगवान बाबा हे वंचित आणि उपेक्षित समाजाचे श्रद्धास्थान म्हणुन ओळखले जातात. समाजातील उपेक्षित आणि वंचित लोकांसाठी त्याग आणि अपेष्ठा सहन करून संत भगवान बाबा ह्यांनी समाजाला शिक्षणाचे दरवाजे खुले करून दिलेत. त्यामुळे बाबा समाजाचे सर्वश्रेष्ठ श्रद्धास्थान बनले पुढे त्यांचे हा समाज कार्याचा वारसा दिवंगत नेते गोपीनाथजी मुंडे यांनी चालवला व समाजाने देखील त्यांना सर्वाधिक प्रेम व पाठबळ दिले. संत भगवान बाबांच्या विचारातुन प्रेरणा घेऊन त्यांची कर्मभूमी असलेल्या भगवान गडावरूनच मा. श्री. गोपीनाथजी मुंडे यांना समाजाची वज्रमुठ आणि ताकद अख्या महाराष्ट्राला दाखवुन दिली. व आज हाच वारसा समोर पंकजा ताईंनी संत भगवान बाबांच्या आशीर्वादाने पुढे नेण्याचा ध्यास घेतला, मात्र त्यांच्या मार्गात अडथळे निर्माण झाले.
भगवान गडावरून राजकीय भाषण नको ह्या भूमिकेतुन महंत नामदेव शास्त्री ह्यांनी पकंजाताईंचा विरोध केला. मात्र सामाजिक भान ठेवत पंकजाताईंनी कुठलाही हट्ट केला नाही. हा वारसा सामोरतर न्यायचाच आहे. समाजातील उपेक्षितांसाठी कार्य करायचेच आहे. परंतु ज्या भगवानगडाला आपण आदर्श मानतो, जे आपले श्रद्धास्थान आहे, तेथे कुठलीही हिंसा नको, अशी उदार भावना ताईंनी दाखवली व सर्व समाजाला सावरगाव घाट येथे एकत्रित होण्याचे आव्हान केले.
भगवान बाबांनी सुरु केलेल्या दसरा मेळाव्याला दिवंगत नेते गोपीनाथजी मुंडे यांनी नव्या उंचीवर नेले व आज त्यांची कन्या म्हणुन समाजाला एक योग्य अहिंसेचा मार्ग दाखवत पंकजाताईंनी जे कार्य ते समाजातील प्रत्येकाला प्रेरणा देणारे आहे. ताई तुम्ही साहेबांचे प्रत्येक स्वप्न पुर्ण कराल व परत एकदा अवघ्या महाराष्ट्राला आपली वज्रमुठ दाखवाल हीच खात्री माझ्या सारख्या प्रत्येक समर्थकाला आहे.