मराठवाडा विकास मंडळ..माझी एक जबाबदारी.

मराठवाडा विकास मंडळाची स्थापना ३० एप्रिल १९९४ रोजी झाली. मा. राज्यपाल महाराष्ट्र राज्य यांनी दि. ५ सप्टेंबर २०११ रोजी सुधारित राजपत्र निर्गमित केले. या राजपत्रानुसार यथोचित बदल करून विकास मंडळाचे कार्य सुरु केले. मराठवाडा विकास मंडळाच्या बाबतीत, औरंगाबाद महसुली विभागातून महाराष्ट्र राज्य विधान मंडळाचा एक सदस्य असेल व त्याची मुदत अडीच वर्ष असेल. सदस्याने मुदत पूर्ण केल्यांनतर तो लागोपाठच्या मुदतीसाठी पात्र असणार नाही. मंडळाचा कार्यकाळ हा पाच वर्षांचा आहे.


मराठवाडा विकास मंडळाचे कार्य हे विस्तारित आहे. यामध्ये विभागाचा विकास आराखडा तयार करणे, केंद्र अथवा राज्य पुरस्कृत योजनांसाठी नियोजन विभागाकडून निधी उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करणे, कार्यान्वित योजनांचे पर्यवेक्षण, संनियंत्रण व मूल्यमापन करणे, मंडळ कार्यालयाचे बळकटीकरण करणे, विविध विषयांवर चर्चासत्र, कार्यशाळा आयोजित करणे व शिफारशी करणे, क्षेत्रीय भेटी आयोजित करणे, प्रशिक्षित मनुष्यबळ निर्माण करणे, असे ह्या सर्वच क्षेत्रांमध्ये मराठवाडा विकास मंडळाच्या कार्यकक्षा विस्तारलेल्या आहेत.


मंडळाचे कार्यक्षेत्र हे संपूर्ण मराठवाडा विभागासाठी असून त्यात औरंगाबाद महसूल विभागातील औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, बीड व उस्मानाबाद या जिल्हांचा समावेश आहे.ह्या जिल्ह्यातील विविध विकासात्मक कामाच्या संबंधात मंडळाच्या सर्वसाधारण बैठक घेण्यात येतात व सिंचन, रस्ते विकास, सामान्य आरोग्य, शिक्षण, तांत्रिक शिक्षण, वैद्यकीय शिक्षण, कृषी, सामाजिक सेवा क्षेत्र अशा विविध क्षेत्राच्या विकासात्मक कामाचा त्यात समावेश आहे.जोपर्यंत औद्योगिक असमतोल कमी होणार नाही तोपर्यंत प्रादेशिक असमतोल कमी होणे शक्य नाही असे मंडळास वाटते. त्यासाठी आर्थिक पायाभूत सुविधा जसे कि उत्तम रस्ते, रेल्वे, विमान सेवा, पाणी, वीज इत्यादी, त्याच बरोबर सामाजिक पायाभूत सुविधा जसे उत्तम शिक्षण संस्था, दवाखाने, कौशल्ययुक्त मनुष्यबळ इत्यादी निर्माण करणे गरजेचे आहे. त्यासाठी मंडळ कार्य करते. त्याच बरोबर तांत्रिक शिक्षणाच्या क्षेत्रातील अनुशेषामध्ये औद्योगिक प्रशिक्षण संस्था, माध्यमिक तंत्र शाळा व तंत्रनिकेतन या घटकांचा देखील समावेश आहे. आरोग्य सेवेच्या क्षेत्रामध्ये ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र, रुग्णवाहिका, उपकरणे व इतर साधनसामुग्री करीत तरतूद करून त्यानुसार जिल्हास निधी उपलब्ध होते.


मराठवाडा विभागातील अधिका-यांशी वेळोवेळी चारच्या करून कृषी विकासाच्या दृष्टीने येणाऱ्या सर्व अडचणींवर मात करण्याचा पुरेपूर प्रयत्न मी कारेन. त्यामध्ये डेअरी, शेतकरी उत्पादक कंपन्या, शेडनेट प्रकल्प अश्या शेतकऱयांशी निगडीत प्रकल्पांना योग्य तो निधी मिळवून देणे, ऊस ठिबक क्षेत्र, सौर ऊर्जा प्रकल्प व पाणी प्रश्न अश्या अनेक प्रश्नांवर तोडगा काढण्याचे काम मंडळ करते. कुठल्याही विभागाच्या विकासात रेल्वे नेटवर्क महत्वाची भूमिका बजावते आणि दुर्दैवाने मराठवाड्यात रेल्वेचे जाळे साधारण दर्जाचे आहे व रेल्वेचे प्रश्न सोडवणे हे मंडळाच्या विचाराधीन आहे. त्यामध्ये वैजापूर-पुणतांबा, औरंगाबाद-धुळे, मनमाड-मालेगाव, पाथरी-मानवत-परळी मार्ग अश्या अनेक कामांना मंजुरी मिळण्यासाठी मंडळाचे काम सुरु आहे.


मराठवाड्यात औद्योगिकरणाचे पायाभूत सुविधा म्हणून एम.एस.ई.बी. क्लस्टर स्थापित करून ग्रामीण भागातील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा मंडळाचा मानस आहे. एम.एस.ई.बी. क्लस्टरमध्ये कृषी आधारित उद्योग, कृषी साहाय्यकारी उद्योग, अन्न प्रक्रिया उद्योग कृषी आधारित अभियांत्रिकी उपक्रम स्थानिक आवश्यक्यता पूर्ण करण्यासाठी शालेय फर्निचर, ट्रेकटर बॉडी बिलडिंग, लेदर वर्क्स , दुग्धोप्तादन, गारमेंट इत्यादी सुविधा उपलब्ध केल्या जाऊ शकतात.


मराठवाड्यातील पर्यटन क्षेत्रांचा विकास करणे, पर्यटक माहिती केंद्र बनविणे, परदेशी पर्यटकांना चलन बदलण्यासाठी कार्यालय औरंगाबादला टुरिस्ट हब बनविणे. पैठणचे नाथ उद्यान जे बऱ्याच वर्षांपासून बंद आहे त्याचा विकास करून सुरु करणे, तेथे पर्यटन वाढल्यास शासनास चांगला महसूल मिळू शकतो व जिल्ह्याचा देखील विकास होऊ शकतो.


असे अनेक क्षेत्र जे अविकसित आहेत त्यांना निधी मिळवून देण्याचे व मराठवाड्याचा सर्वतोपरी विकास करण्याचे काम मी करणार आहे व मराठवाड्यावर आता या पुढे कुठलाही अन्याय होऊ देणार नाही. आपण सर्वांनी मला या कार्यास साथ द्यावी व आपले काही विचार, सूचना असल्यास त्या माझ्यापर्यंत नक्कीच पोहचावा, मी सदैव आपल्या सेवेत राहीन.
धन्यवाद !
जय हिंद, जया महाराष्ट्र !!

-डॉ. भागवत कराड

Share and Rate This Article.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Connect

Get in touch with Us

If you've any enquirey, let us know we'll call you back.

NGA Branding India Pvt. Ltd.

Office:

NGA, C-38, Front lane of MIT Hospital, Sector N 4, Cidco, Aurangabad, Maharashtra 431005

+91 96238 14222

Email: info@nga.co.in

Website: www.nga.co.in