बुलेट ट्रेनमुळे देशाची वेगवान प्रगती

आताच जापानचे प्रधानमंत्री शिंजो आबे भारतात आले होते व साबरमती येथे त्यांनी बुलेट ट्रेनचे भूमीपुजन केले. त्यामुळे आपल्या देशाचे प्रधानमंत्री मा. श्री. नरेंद्र मोदी यांच्या विदेशी धोरणाला एक प्रकारचे बळ मिळाले असे म्हणता येईल. बुलेट ट्रेनचा काय फायदा किंवा इतके पैसे खर्च करून देशाला काय मिळणार ? हा साधारणपणे सर्वसामान्यांना पडलेला प्रश्न ?

मुंबई आणि अहमदाबाद दरम्यानच्या अतिवेगाने रेल्वेमुळे (एच एस आर) भारतीयांसाठी रोजगारनिर्मितीत लक्षणीय बदल होणार आहेत. भारतातील महानगरे जोडणारा हा पहिला ” डायमंड क्वाड्रिलॉटरल ” म्हणजे हीरक चतुष्काने ठरणार आहे. रेल्वेगाडयांचे उत्पादन आणि भविष्यातील बुलेट रेलगाडयांच्या निर्मितीची प्रक्रिया तसेच विविध सुटया भागांच्या निर्मितीसाखळ्या आणि त्याचे हजारो पुरवठादार यांची एक परस्परनिर्भर व्यवस्थाच यामुळे निर्माण होणार आहे. मोदींच्या मेक इन इंडीया योजनेला यामुळे संजीवनी मिळु शकेल आणि भविष्यात जापानच्या सहकार्याने अशिया-अफ्रीका विकास महामार्गात समावेश असलेल्या अन्य देशांनाही आपला देश बुलेट ट्रेन तंत्रज्ञानाचे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर यांचा पुरवठा करणारा स्त्रोत ठरू शकेल. भारतातील व परदेशातील मुलभुत सोयीसुविधा प्रकल्पांसाठी लागणा-या मनुष्यबळाचे प्रशिक्षण आणि या प्रकल्पांची अंबलबजावणी या प्रांतातही मोठी कामगिरी होऊ शकेल. यापुर्वी स्वस्त विमानसेवेमुळे अनेक भारतीय प्रवासी हे रेल्वेकडुन हवाई मार्गाकडे वळले आहेत आणि व्यवसायांनाही त्याचा फायदा झाला. पण देशाच्या आर्थिक दरासंदर्भात मात्र ते तितकेच फायदेशीर ठरलेले नाही.

शिवाय हवाई इंधन हे आयात करावे लागते आणि ते मोठया प्रमाणात कार्बन उत्सर्जन करते, पर्यायी पर्यावरणाचे नुकसान होते. विशेष म्हणजे एक अतीवेगाने ट्रेन (बुलेट ट्रेन) एका वेळी दहा विमांनाएवढे प्रवासी वाहून नेऊ शकते. ह्या बुलेट ट्रेनमुळे आपण पर्यावरण संतुलन व प्रगती असे दोन्ही साध्य करू शकतो व भारतीय प्रवाशांसाठी ही एक चांगली निवड ठरू शकते. मुंबई-अहमदाबाद प्रकल्प ही भारताची एकल कामगिरी आहे.
ह्या एचएसआर प्रकल्पाला जापान मोठया प्रमाणावर निधीपुरवठा करत आहे. मुलभुत सोयीसुविधा क्षेत्रातील व्यवसायिकांसाठी हा प्रकल्प म्हणजे तंत्रज्ञान आणि अंमलबजावणी यांचा वस्तुपाठच ठरणार आहे. अनेक भारतीय व जापानी कंपन्यांमध्ये व्यापारी करार होतील. प्रशिक्षकांचे प्रशिक्षण आणि तंत्रज्ञानाचे आदानप्रदान हे तर आधीच सुरु झालेले आहे. विशेष म्हणजे ह्या जापान आपल्याला १,१०,००० करोडचे कर्ज हे फक्त ०.१ ह्या व्याजदराने देत आहे जो कि फार अल्प दर आहे व त्याची रकमेची परतफेड करण्याचा अवधी हा ५० वर्षे इतका आहे. म्हणजेच ह्या प्रकल्पाला जापान करत असलेला निधीपुरवठा हा अतिशय उदार अटीशर्तीवर आहे.

हा प्रकल्प भागात होणार आहे. मुंबई – अहमदाबाद हे पहिल्या भागातील काम आहे.पुढील भागात दिल्ली -मुंबई ,मुंबई – चेन्नई, दिल्ली – नागपूर, व मुंबई – नागपूर. ह्या मार्गांचे देखील काम होण्याचे योजले आहे. जवळपास ७०% भारताची उभारणी अद्याप व्हायचीय आहे असे म्हणतात. या एचएसआर प्रकल्पामुळे निर्माण झालेली स्पर्धात्मकता भारताची जलद उभारणी होण्यास हातभार लावेल. तेव्हा टीका करणारे विरोधक व संभ्रमात असलेले सर्वसामान्य नागरिक हे येत्या काही वर्षातच आपली नकारात्मता मागे टाकुन स्वतः देशातील सर्वात वेगवान रेल्वेच्या माध्यमातुन प्रवास करतांना दिसतील. सुदैवाने आज ८० च्या दशकापेक्षा वेगळे, अधिक प्रबुद्ध, अधिक व्यापक विचार करणारे व ते झपाटयाने आंमलात आणणारे नेतृत्व देशाला मोदीजींच्या स्वरूपाने भेटले आहे. हे नेतृत्व देशाला नक्कीच उभारी देईल हा विश्वास मला आहे.
!! जय हिंद !!

Share and Rate This Article.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Connect

Get in touch with Us

If you've any enquirey, let us know we'll call you back.

NGA Branding India Pvt. Ltd.

Office:

NGA, C-38, Front lane of MIT Hospital, Sector N 4, Cidco, Aurangabad, Maharashtra 431005

+91 96238 14222

Email: info@nga.co.in

Website: www.nga.co.in