शंभर वर्षांहून अधिक काळ झाला, महाराष्ट्रात गणेशोत्सव साजरा केला जातो. या समाजाची प्रगती व सर्वांगीण उन्नती साधण्याचे एक साधन म्हणुन सार्वजनिक गणेशोत्सवाला प्रारंभ करण्यात आला. बदललेल्या जगराहाटीच्या अपरिहार्य परिणाम म्हणुन लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या या गणेशोत्सवाचा चेहरामोहरा आता पुर्णपणे बदलला आहे.
सर्व स्तरातील लोकांनी एकत्रित येऊन समाजातील समस्या आपल्याला कशा सोडविता येतील याबद्दल काम करणे अशी धारणा ठेवुन गणेशोत्सवाला प्रारंभ झाला. मात्र आज गणेशोत्सवाच्या नावाखाली होणा-या काही गैरप्रकारामुळे सामाजिक स्वास्थ पार बिघडुन गेलय. आपण सर्वांनीच काही गोष्टींचे भान ठेवले तर, गणेशोत्सव हा उत्तम आणि सांस्कृतिक पद्धतीने साजरा होवु शकतो.
अवाढव्य मुर्त्या ह्या मुळे होणारी वाहतुकीची कोंडी शिवाय गणेशोत्सवाच्या कार्यकर्त्यापासून ते संपुर्ण राज्यातील पोलीस कामाला लागलेले दिसतात. पुणे-मुंबई सारख्या ठिकाणी तर विसर्जनच्यावेळी तटरक्षकदलाच्या जवानांपर्यंत सगळेजण या कार्यात मग्न असतात. एवढे मोठे मनुष्यबळ, संघशक्ती ह्या दिवसात कार्यरत असते. आपले सर्व पोलीस बांधव दिवस रात्र एक करून काम करतात. त्यांचीही काळजी करून आपण शांतता पुर्वक वातावरणात सण साजरा करण्याचा प्रयत्न सर्वांनी करावा.
उत्सवाच्या वेळी होणा-या ध्वनिप्रदुणाचा त्रास विद्यार्थी, अबाल-वृद्ध, रूग्ण सर्वांनाच होतो. यासाठी ध्वनीवर्धकांचा आवाज शक्यतितका कमी ठेवावा. तसेच या गणेशोत्सवात सर्वांनी संकल्प करावा की, चीन उत्पादीत वस्तुंची म्हणजे डेकोरेशनसाठी लागणारे लाईटस, हारे वापरू नये त्या ऐवजी भारत उत्पादीत वस्तुंचा वापर करावा.
याही पलीकडे गणेशोत्सवानिमित्त प्रत्येक कुंटुंबाने आणि सार्वजनिक मंडळाने काही ठराविक रक्कम बाजूला काढावी. अशा निधीतुन शैक्षणिक संस्थांना आथिर्क मदत करता येईल. काही सेवाभावी संस्थांना मदत करता येईल किंवा यथावकाश एखादे छोटे रुग्णालयही बांधता येईल.
आपले प्रधानमंत्री मा. श्री. नरेंद्रजी मोदी यांनी ह्या गणेशोत्सवाच्या पावन दिनाच्या निमिताने ‘ संकल्प से सिद्धी ‘ ह्या मोहीमेची सुरवात केली आहे. तेव्हा सजग नागरीक बनुन येऊ घातलेल्या सणांच्या माध्यमातुन देशाला गरिबी, जातीवाद, विषमता व बेरोजगारीच्या विळख्यातुन मुक्त करू या. आपण सर्वांनी ठरविले तर, ह्यात काहीच कठीण नाही. तेव्हा आपण सर्व पुढाकार घेऊया व सांस्कृतिक गणेशोत्सव पार पाडूया.
!! गणपती बाप्पा मोरया !!
Share and Rate this article.
0/5
Facebook
Instagram
Whatsapp
Twitter
NGA, C-38, Front lane of MIT Hospital, Sector N 4, Cidco, Aurangabad, Maharashtra 431005
+91 96238 14222
Email: info@nga.co.in
Website: www.nga.co.in