महिला सबलीकरण एक स्वप्न

भारतीय संस्कृतीत पूर्वीपासुनच स्त्रीयांना अन्यन्य साधारण महत्व आहे. भारतीय तत्वानुसार अस्तित्वाच्या त्रिकोणाच्या पायाच्या एका टोकाला पायाभूत सुविधासमृद्धी देणारी लक्ष्मी, दुसऱ्या टोकाला संरक्षणशक्ती देणारी महाकाली आणि शिरोबिंदु मध्ये ज्ञान, विचार देणारी महासरस्वती असते. अशा प्रकारे ह्या तीन शक्तीना विशेष स्थान दिलेले आहे. इतके अगाध तत्वज्ञान भारतीय शाखात मांडलेले असुन सुद्धा आजच्या महिला सक्षम आहेत का? असा प्रश्न वारंवार उभा राहतो. उच्चशिक्षित असणे, नोकरी करणे किंवा पाहिजे ते कपडे घालण्याची मुभा असणे म्हणजे स्त्री स्वातंत्र्य आहे का ? हे सगळे म्हणजे स्त्री ध्येय आहे का ? भारतीय स्त्रीया ह्या पलीकडे पाऊल कधी टाकणार ? हे प्रश्न आजही आहेत.

आज बरीच सुधारणा स्त्री शिक्षणात झालेली आपल्याला दिसते. आई-वडीत मुलींना उच्च शिक्षण देण्यासाठी आग्रही असल्याचेही आपण पाहत आहोत मात्र ह्या उच्चशिक्षित मुलींना देखीत लग्नाच्या बोहल्यावर मी लग्न झाल्यावरही काम करणार अशी परवानगीवजा पूर्वकल्पना द्यावी लागते. तिच्या आयुष्यातील कुठलेही निर्णय मग ते छोटे असोत वा मोठे ते घेण्याचे पाठबळ आपण तिला देतो का? आजही आपल्या समाजात स्त्रीया रोजच्या जीवनातील समस्यांसाठी आपल्या नवऱ्यावर किंवा वडीलांवर अवलंबुन आहोत. एवढेच नव्हे तर छोटया समस्या असो किंवा स्वतःच्या मातृत्वाच्या निर्णयापर्यंत कित्येक निर्णय घेण्याची क्षमता महिलांमध्ये नक्कीच असते. पण त्यांना ते निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य आजही समाजातुन मिळत नाही हे तेवढेच खरे. तसं पाहता समाजातील स्वतःचे न्यायस्थान जगभरात कुठेही भारतातील महिलांना पुरुषांप्रमाणे उक्त मिळाले नाही.

आज महिला स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव करूना देण्यासाठी विविध क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खादा लावून काम करत आहेत व बऱ्याच अंशी यश देखील संपादन करत आहेत. खर तर संधीवचीत महिलांना कोणत्याही भेदभावाशिवाय प्रगती करण्याची संधी मिळणे म्हणजे महिला सबलीकरण, महिलांना कोणाची दया किया किंव नको तर, त्यांना पुरुषाप्रमाणे सम्मान संधी हवी आहे. दुर्बलता नष्ट करणारी, मानव बुद्धीमध्ये स्वत्वाची जाणीव व स्वतः बहुत जागरूकता निर्माण करणारी व त्यादृष्टीने स्वयंविकासासाठी प्रवृत्त करणारी एक संकल्पना म्हणजे महिला सक्तीकरण भारतीय संस्कृतीच्या इतिहासाची पाने उत्तगदन पाहिली तर एक गोष्ट लक्षात येते की पूर्व कालखंडात स्त्रीयांना पुरुषांच्या बरोबरीचे स्थान होते. मात्र आजच्या समाजातील स्त्रीयांचे स्थान काय याचा विचार केला तर एक गोष्ट लक्षात येते. मातृसत्ताक कुटुंब पद्धतीने जिथे घरातील सर्व अधिकार महिलाकडे आहेत. तर सामाजिक जीवनात तिच्या विचाराचा लवलेशहि नाही.

एक मनुष्य म्हणुन आपण स्त्रीकडे कधी पाहिलच नाही हे खर वास्तव आहे. पूर्वीपेक्षा आजचं चित्र निःसंचय सुखावह आहे. पूर्वीची प्रतिमा आता विस्तारली आहे. सामान्य गृहीणीपासुन डॉक्टर राजकारण, विधी तज्ञ, लेखिका उद्योजिका, अंतराळवीर, पत्रकार अशा अनेक क्षेत्रात स्त्रीयांनी आपले स्वतःचे अस्तित्व निर्माण केले आहे. तरी आपण एका पायरीवर अडकून पडलो आहोत. तिथुन पुढे पाऊल टाकणे आत्ता महत्वाचे आहे. ते फक्त महिलानीच टाकण्यापेक्षा सर्व समाजाने एकत्र टाकायला हवे. मुळात जी नैसर्गिकदृष्टया सबला आहे व जी अबला कधीच नव्हती तीला आपण अबला केले तीला आत पुन्हा सबला करण्यात आपण गुतलेलो आहे.

आजपर्यंत सरकारने महिला सबलीकरणासाठी अनेक योजना राबल्या मात्र हे ध्येय जर पूर्ण न्यायचे असेल तर त्याची सुरवात प्रत्येकाला आपल्या घरापासून करावी लागेल. स्त्री म्हणजे अबला हि एक मानसिकता झालेली आहे. तिला बदलावी लागेल. ह्यासाठी जर प्रत्येकाने पुढाकार घेतला तर आपण स्त्रियांना त्याचे क्षितीज मिळण्यास नक्कीच यश मिळवून देऊ शकतो. या महिला दिनानिमित्त आपण सर्वानी मिळून संकल्प करूयात महिला सबलीकरणाच्या जागतिक महिला दिनाच्या सर्व माता भगिनींना हार्दिक शुभेच्छा !

Share And Rate This Article.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Connect

Get in touch with Us

If you've any enquirey, let us know we'll call you back.

NGA Branding India Pvt. Ltd.

Office:

NGA, C-38, Front lane of MIT Hospital, Sector N 4, Cidco, Aurangabad, Maharashtra 431005

+91 96238 14222

Email: info@nga.co.in

Website: www.nga.co.in