फडणवीस सरकारची ३ वर्षे म्हणजे राज्याच्या नव्या आत्मविश्वासाची, प्रगतीच्या ध्यासाची व पारदर्शी कारभाराची. ह्या तीन वर्षात महाराष्ट्र सरकारने दाखवुन दिले. ह्या तीन वर्षात सरकारने यशस्वीपणे आव्हान पेलत राज्याला विकासाच्या मार्गावर आणले आहे. अर्थात हे सर्व घडण्यासाठी सरकारला अनेक अडचणींना व आव्हानांना तोंड द्यावे लागले. जसे की राज्यावर असलेला कर्जाचा डोंगर, शेतकरी आत्महत्यांची मोठी संख्या, शेती विकासाचे घटते दर, सिंचन व्यवस्था, रस्त्यांची दुर्दशा, विजेचा खेळखंडोबा, वाढती बेरोजगारी यांसारख्या अनेक गोष्टी मागील मागील सरकारकडुन विद्यमान सरकारला वारसा म्हणुन मिळाल्या होत्या. मात्र तरीही हे सरकार डगमगले नाही तर, दमदार पावले टाकत गेल्या तीन वर्षात राज्याला नव्या उंचीवर नेण्याचे काम भाजपा सरकारने केले.
कोणत्याही राज्याच्या विकासात तीन गोष्टी महत्वाच्या असतात. शेती, उद्योग व सेवा क्षेत्राचा विकास. या तीनही क्षेत्रात विद्यमान सरकारने भरीव कामगिरी केलेली आहे. उगाच तोंडकौतुक केल्यापेक्षा आकडेवारी समोर ठेवुन झालेला बदल लक्षात घेऊ पुर्वीच्या सरकारच्या कार्यकाळात शेतीचा विकासदर हा उणे ११ % इतका होता. मात्र भाजप सरकारने शेतीत गुंतवणुक वाठवली आणि शेतीचा विकासाचा दर उणे ११ % वरुन अधिक १२.५ % (टक्के) वर नेला. २०१६-२०१७ मध्ये शेतीत क्षेत्रात ५६ हजार कोटींची गुंतवणुक केली. जलयुक्त शिवारसारख्या प्रभावी योजना राबवल्या. या योजनेने तर महाराष्ट्रात अक्षरश: क्रांती घडवुन आणली. पाणी जमिनीत मुरल्यामुळे पाण्याची पातळी वाढली व त्यामुळे दरवर्षी टँकरवर अवलंबुन असणारी गावांची संख्या प्रचंड प्रमाणात कमी झाली. शेतीला पाणीपुरवठा वाठल्याने फायदा झाला.
सर्वात महत्वाचा उपाय म्हणजे शेतक-यांसाठी देशातील आजपर्यंतची सर्वात मोठी कर्जमाफी करण्याचा निर्णय या सरकारने घेतला. पहिल्या टप्प्यातील ४,००० कोटींची कर्जमाफी पुर्ण देखील झाली. शेतीमालाला सर्वाधिक हमीभाव या तीन वर्षात मिळालाच, पण शेतक-यांना हवे तिथे माल विकण्याचा अधिकारही फडणवीस सरकारने दिला. शेती सुधारणांमध्ये महाराष्ट्राचा पहिला नंबर असल्याचे निती आयोगाच्या जुलै २०१७ च्या अहवालात म्हटले आहे.
उद्योग क्षेत्रात देखील भरीव कामगिरी ह्याच सरकारच्या कारगिरर्दीत झाली. मेक इन इंडीयाच्या माध्यमातुन राज्यात मोठ्या प्रमाणात उद्योग व गुंतवणुक वाढत आहे. २०१६ – २०१७ मध्ये २ लाख २० हजार कोटींची गुंतवणुक या राज्यात झाली. जे की देशाच्या एकुण गुंतवणुकीच्या ५० टक्के आहे. अनेक मोठे उद्योग बाहेरुन राज्यात येत आहे. त्यामुळे राज्याची प्रतिमा देखील सुधारली आहे. इतकेच नव्हे तर ह्या सरकारच्या नियोजनबद्ध धोरणाने पायाभुत सुविधांमध्ये देखील बदल दिसायला लागला. कायदा व सुव्यवस्था मध्ये बदल घडत आहेत. त्यासाठी अनेक महत्वपुर्ण निर्णय ह्या सरकारने घेतले. फॉरेन्सिक लॅबची संख्या वाढवण्यात आली, आरोपपत्र गुणवत्ता तपासणी यंत्रणा तयार करण्यात आली. प्रमुख शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले. शिवाय पोलीस स्टेशनस ऑनलाईन जोडण्यात आलीत.
ह्याच बरोबर समृद्धी महामार्ग, विजेचा प्रश्नमार्गी लावणे, स्वच्छतागृहे, जात प्रमाणपत्र मिळणे सुलभ करणे, सिंचन प्रकल्पासाठी मोठे पाऊल, घरकुल योजना, अन्नप्रक्रिया धोरणास मंजुरी अशी बरीच राज्याच्या हिताची कामे ह्या सरकारने मार्गी लावलीत. मुख्य म्हणजे राज्याची विस्कटलेली अवस्था भाजपा सरकारने पुन्हा रुळावर आणली. मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस ह्यांच्या प्रामाणिक इच्छा शक्तीमुळे अनेक सकारात्मक बदल महाराष्ट्र राज्यात घडुन आलेत. त्यांची दुरदृष्टी व मार्गदर्शन यांच्या बळावर महाराष्ट्र राज्याच्या हिताचे प्रत्येक उद्दिष्ट साध्य होईल हा विश्वास महाराष्ट्रातील प्रत्येक माणसात आहे.
जय हिंद, जय महाराष्ट्र !
Share and Rate This Article.