राज्यातील १६ जिल्ह्यांतील ३,१३१ ग्रामपंचायती व थेट सरपंचपदासाठी शनिवारी झालेल्या निवडणुकांचे निकाल सोमवारी जाहीर झाले व पुन्हा एकदा भाजपने आपली विजयी पताका फडकवत राज्यात पहिल्या क्रमांकाचा मान पटकावला.भाजपा सरकार हे श्रीमंतांचे सरकार आहे, शहरातील लोकांसाठी काम करते व विशेष स्तरावरील लोकांसाठी हे सरकार काम करते असे आरोप विरोधी पक्ष कायमच करत आलेले आहेत. परंतु ग्रामपंचायत निवडणुकांत हे लक्षात आले की, प्रत्येक गावागावांत कमळ फुलले आहे. सामान्य जनमाणसात भाजपा वर विश्वास आहे. भाजपाने गावांतील लोकांसाठी केलेली विकास कामे ही नक्कीच लोकांच्या मनात रुजली आहेत.
जनतेने पुन्हा एकदा भाजपाला निवडून आणुन हे दाखवुन दिले की, जाती-पातीचे राजकारण सामान्यजनतेला नकोय तर, कारण विकास हवा आहे. भाजपाने केलेला विकास व पुढील वर्षातील त्यांचे नियोजन यावर जनतेने विश्वास दाखवुन इतरही पक्षांना हा संदेश दिला आहे की, जातीकारण नकोय विकास हवा आहे ?
आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांचे व्यक्तीमत्व पारदर्शी असुन केलेल्या कामाची जबाबदारी घेणे अर्थात उत्तरदायित्वाचा मुल्यांवर त्यांचा विस्वास आहे. तसेच गरीब-श्रीमंत भेद, जाती-समुदायांमधील भेदभाव हे सर्व ध्यानात घेता, राज्यात अनेकतेतुन एकता असण्याऐवजी अनेकतेतुन विविधता आहे असे त्यांना वाटते. केवळ काहीच लोकांना नव्हे तर, प्रत्येकाला विकासाची फळे मिळावीत ह्यासाठी ते कायम प्रयत्नरत आहेत व त्यांच्या त्याच प्रयत्नांना जनतेने देखील पावती देत ग्रापंचायतीत सर्वाधिक मताधक्क्याने भाजपाला निवडुन दिले. तसेच राज्याचे प्रदेशअध्यक्ष मा. श्री रावसाहेब दानवे यांनी घेतलेली मेहनत व केलेली विकास कामे ह्यांची दखल सामान्य जनतेने घेतली व भाजपाला नं. १ चा पक्ष बनवला मात्र प्रदेशअध्यक्षांनी याचे श्रेय न घेता गावस्तरावर काम करणा-या भाजपच्या कार्यकर्त्यांना दिले. तिकडे पंकजाताईंनी पक्षासाठी अनेक कामे करत विजयात मोठा हातभार लावला.
मा. श्री. प्रधानमंत्रीनरेंद्रजी मोदी ह्यांच्या ”सबका साथ, सबका विकास” ह्या धोरणाची अंमलबजावणी करत भाजपाच्या सर्व नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी जी काही विकास कामे ह्या तीन वर्षात पार पाडली. त्या सर्व कामांची योग्य अशी पावती सर्व सामान्य जनतेने भाजपाला देत प्रचंड मतांनी विजयी केले व घराघरात कमळ फुलले. त्याबद्दल जनतेचे आभार !