आज आपण सद्य:स्थितीतील स्वदेशी आंदोलना विषयी सर्व जण बोलत आहोत. प्रत्येक जण ह्या विषयी बोलतांना आपल्याला दिसतो. स्वदेशी वस्तु वापरा, चीनी वस्तुंवर बहिष्कार करा, पण ब-याच जणांना असा प्रश्न पडतो की, असे केल्यास काय फायदा होईल किंवा मी हे का करावे ? ही शंका असणे हे ठीक आहे परंतु आज चिनी वस्तूंचा वापर बंद करणे हे देशासाठी अतंत्य आवश्यक झाले आहे. आपल्या देशाचा 190 देशांशी व्यापार आहे. त्यात सर्वात मोठा Trade Partner चीन झाला आहे, भारताकडून चीनकडे केवळ 9 बिलीयन डॉलरच्या वस्तुंची निर्यात होते आणि चीनकडून मात्र भारताला 61.8 बिलीयन डॉलरच्या वस्तुंची आयात होते. एवढया प्रमाणात आयात होत असल्यामुळे 52.8 बिलीयन डॉलर चा दरवर्षी भारताला तोटा होतो. आपल्या देशाला विदेशांपासून होणा-या एकूण तोटयापैकी 44 % तोटा हा एकटया चीनकडून होतो. चीनकडून होणारा वार्षिक तोटा जर रुपयांमध्ये सांगायचा झाला, तर तो 3556 अरब रूपये एवढा होतो. चीनकडून ज्या वस्तुंची आयात होते त्यामध्ये इलेक्ट्राँनिक खेळणी, शोभेच्या वस्तु, मोबाईल इ. वस्तु तसेच कारखान्यांमध्ये उपयुक्त अशा मशिनीरींची देखील समावेश आहे. वर्तमान काळात आपल्या देशाला आर्थिक व्यवहारासारख्या मोठया विषयांकडे लक्ष केंद्रीत करण्याची नितांत आवश्यकता आहे. युवा वर्गाकडून ही अपेक्षा जास्त आहे. जर आपली निर्यात वाढली तर आपले उत्पादन क्षेत्र, कारखानदारी वाढेल. याचा आपोआप परिणाम रोजगार निर्मितीमध्ये होईल. परंतु आपण स्वदेशी उत्पादीत वस्तुंचा वापर कमी प्रमाणात करत असल्याने व चिनी वस्तुंचा वापर जास्त प्रमाणात करत असल्याने आपल्या देशातील उद्योगधंदे बंद पडत आहेत. रोजगार संपुष्टात येऊन येथील मजुरांवर उपासमारीची वेळ येत आहे. भारताला व्यापारामध्ये अडथळा निर्माण करण्यासाठी चीन (NSG – Nuclear Supplier Group) मध्ये भारताचा प्रवेश होऊ न देण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहे. एन एस जी चे सदस्य होण्याचे भारताला अनेकविध फायदे आहेत. परंतु यातील मुख्य अडथळा चीन आहे. एवढेच नव्हे भारताला अडचणीत आणणे व पाकिस्तानला भारतविरोधी कारवायांमध्ये समर्थन देणे ही चीनची जणू दैनंदिनीच झाली आहे. पाकिस्तान जर भारताविरोधी दहशतवादी कारवाया थांबवणार नसेल, तर भारताला सिंधू नदीचे पाणी बंद करावे लागले असे म्हणताच चार दिवसांनंतर लगेच चीनने ब्रह्मपुत्रा नदीची, उपनदी जेकोबाचे भारतात येणारे पाणी थांबवले. परिणामी पूर्व-उत्तर भारतामध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण करेल. आपला मित्रराष्ट्र असलेल्या अफगाणिस्तान मध्ये पाकिस्तानच्या मदतीने तालिबानी दहशतवादयांना पुन्हा उभे करण्याचे काम चीन करीत आहे. 1962 पासून आपल्या 42700 चौ. कि. मी भूमीवर चीन कब्जा करून बसला आहे. त्यावेळी आपले 3080 सैनिक शहीद झाले होते. हे आपण विसरून चालणार नाही. आजही आपल्या अरूणाचल प्रदेशासह 90,000चौ. कि. मी. भूमीवर चीन हक्क दाखवत आहे. येणारा प्रत्येक दिवस चीनी सैनिक आपल्या सीमेवर अतिक्रमण करून सातत्याने त्रास देत आहेत. चीन सतत आपल्याला चारही बाजूंनी वेढा देण्याचा, अडचणीत आणण्याचा व शेजारी राष्ट्रांना आपल्या विरुद्ध भडकविण्याचा प्रयत्न करत आहे. सध्या डोकलाम सीमेवरून चीन दररोज भारताला युद्धाच्या धमक्या देत आहे. परंतु भारतीय सैनिक हे हिमतीने सीमेवर उभे आहेत. ते तर त्यांचे काम करतच आहेत. परंतु आपण चीनी वस्तुंवर बहिष्कार घालून आपले योगदान द्यावे तसेच चीनी वस्तु विकत न घेण्यासाठी लोकांना प्रवृत्त करावे. आपल्या सीमेवर उभे असलेल्या जवानांना आपण साथ देऊ व स्वदेशीचा वापर करू असा संकल्प प्रत्येकाने करावा. वरील सर्व बांबीवर लक्ष देता असे लक्षात येते की, आपल्या देशाच्या सुरक्षिततेसाठी, ट्रेड बॅलेन्स व्यवस्थित करण्यासाठी, नवीन रोजगार निर्मितीसाठी चिनी वस्तुंवर बहिष्कार टाकणे अनिवार्य आहे. प्रत्येक भारतीय नागरिकांनी चायना उत्पादीत वस्तुंची खरेदी थांबवावी व स्वराष्ट्र उत्पादीत वस्तुंची खरेदी करून आपल्या राष्ट्राला बळकट बनविण्यास सहकार्य करावे. चीनी वस्तूंचा वापर बंद करून आपल्या भारताला विश्वातील सर्व शक्तिमान देश बनविण्यासाठी प्रत्येकाने हातभार लावावा. जयहिंद !