फडणवीस सरकारची ३ वर्षे म्हणजे राज्याच्या नव्या आत्मविश्वासाची, प्रगतीच्या ध्यासाची व पारदर्शी कारभाराची. महाराष्ट्र राज्याचे भवितव्य उज्ज्वल आहे हे सरकारने गेल्या तीन वर्षात दाखवुन दिले व त्याचे सकारात्मक परिणाम आपण सर्वच अनुभवत आहोत. व यापुढे भाजप सरकारच्या नेतृत्वाखाली राज्याच्या विकासाचा आलेख अधिकाअधिक उंचावत राहणार आहे.
अर्थात हे सर्व घडण्यासाठी फडणवीस सरकारला अनेक अडचणींना व आव्हानांना तोंड द्यावे लागले. त्यामध्ये महत्वाचे म्हणजे राज्यात होणा-या शेतकरी आत्महत्या, शेतक-यांची कर्जमाफी व मराठा आरक्षणाचा मुद्दा मात्र मा. श्री. मुख्यमंत्री यांनी समाजातील सर्वच स्तरांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रगतीशील परिवर्तन घडुन आणलेले आहे. शेतक-यांची पहिल्या टप्प्यातील ४,००० कोटींची कर्जमाफी ही पुर्ण देखील झाली. जलयुक्त शिवार या योजनेने मराठवाड्यातील मोठा पाणी प्रश्न मार्गी लावला. लातुरला ऐन गरजेच्या वेळी ट्रेनने पिण्याचे पाणी पुरवण्याचा निर्णय ह्याच सरकारने घेतला. त्यातच ह्या तीन वर्षात सरकारचा मित्र पक्ष असलेली शिवसेनेने सरकारच्या प्रत्येकच योजनेस वारंवार विरोधच केला. तेव्हा शिवसेना हा युतीतील घटक पक्ष आहे की, प्रतिस्पर्धी असा प्रश्न पडावा इतकी टीका सेनेने भाजपावर व मुख्यमंत्र्यांवर केली मात्र भाजपने ते सर्व झेलत राज्यात विकास कामे मार्गी लावली व पुढील येणा-या वर्षात अनेक विकासकामांच्या योजनेंना गती मिळणार हे नक्की.
ह्या तीन वर्षात राज्यात जिल्हा परिषद, नगरपालिका व ग्रामपंचायत निवडणुका झाल्यात ह्या सर्वच निवडणुकीत पुर्वी भाजपा हा चौथ्या नंबरचा पक्ष होता मात्र, आज तो पहिल्या नंबरचा पक्ष झालाय. यासाठी राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस व प्रदेशाअध्यक्ष श्री. रावसाहेब दानवे यांना श्रेय द्यायलाच हवे.
समृद्धी महामार्ग, विजेचा प्रश्न मार्गी लावणे, स्वच्छतागृहे, जात प्रमाणपत्र मिळणे सुलभ करणे, सिंचन प्रकल्पांसाठी मोठे पाऊल, घरकुल योजना, अन्नप्रक्रिया धोरणास मंजुरी अशी बरीच राज्याच्या हिताची कामे ह्या सरकारने मार्गी लावलीत व त्यातील काही पुर्णत्वास देखील नेली आहेत.
मा. श्री. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या रुपात एक प्रामाणिक आणि कुशल नेतृत्व राज्याला भेटले आहे व जनतेने देखील ह्या सरकारवर विश्वास दाखवला आहे. सर्वसामान्यांच्या उन्नतीसाठी दुरदृष्टीने कार्यरत असलेल्या ह्या भाजपा सरकारला जनतेने दिलेले प्रेम ह्यावर हे सरकार पुढेही खरे उतरेल यात काही शंकाच नाही. मुख्यमंत्री मा. श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वापुढे राज्यहिताच्या विरोधात जाणारे कोणतेही आव्हान टिकु शकणार नाही. त्यांची दुरदृष्टी व मार्गदर्शन यांच्या बळावर महाराष्ट्र राज्याच्या हिताचे प्रत्येक उद्दिष्ट आपण साध्य करु हा विश्वास मला आहे.
जय हिंद, जय महाराष्ट्र !
Share And Rate This Article
0/5
Facebook
Instagram
Twitter
Whatsapp
NGA, C-38, Front lane of MIT Hospital, Sector N 4, Cidco, Aurangabad, Maharashtra 431005
+91 96238 14222
Email: info@nga.co.in
Website: www.nga.co.in